
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, भंडारा दि.14 : आमदार राजू कारेमोरे यांचे भाऊ रामेश्वर माणिकराव कारेमोरे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची आज पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी एकलारा वरठी येथे त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, वडील माणिकराव कारेमोरे व कारेमोरे कुटुंबातील सदस्य, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, कांग्रेसचे जिया पटेल उपस्थित होते.
