
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । थोर स्वातंत्र्य सेनानी आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना आज जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन करण्यात आले. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधान भवन परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण केले.

याप्रसंगी विधानपरिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज यांच्यासह अधिकारी – कर्मचारी यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
