
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौक, फलटण येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. पांडुरंग गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटणचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. विवेक शिंदे, श्रीराम कारखाना संचालक महादेव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महात्मा जोतिबा फुले जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांच्या वतीने श्री. विकास नाळे (उपसरपंच, कोळकी) यांच्या हस्ते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा जोतिबा फुले जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व नागरिक बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
