माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । मुंबई । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवार, दि. 1 जुलै रोजी विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य हरिसिंग राठोड व महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव राजेश तारवी, विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव संतोष पराडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!