छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.व.का) सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

माजी आमदार रामभाऊ गुंडिले, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव प्रकाश इंदलकर, अवर सचिव विठ्ठल भास्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!