
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । मुंबई । आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



