माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंत्रालय येथे अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. २१: माजी प्रधानमंत्री  दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई तसेच वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त देशाची अखंडता, व सहिष्णुता यावर निष्ठा ठेवून सर्व प्रकारच्या दहशतवाद, हिंसाचाराचा मुकाबला करण्याची, सर्व मानवजातीत शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकवित मानवी मूल्यांना धोका पोहचविणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ दिली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्री. लोकेश चंद्रा, सहसचिव श्री. वारभुवन यांच्यासह विविध विभागाचे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!