पेडगावात ग्रामसेवकास मारहाण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, वडूज, दि. १८ : पेडगाव (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवशंकर दामशेट्टी यांना गावातीलच एकाने मारहाण व शिवीगाळ करण्याची घटना घडली आहे.

दामशेट्टी हे शुक्रवारी दि. १७ रोजी नेहमीप्रमाणे गावामध्ये गेले होते. ग्रामपंचायतीचे दप्तरी कामकाज करून महादेव मंदिरापाठीमागील बाजूस वृक्षारोपण पाहणी करण्याकरिता गेले होते. त्या ठिकाणी बाजूला लघुशंका करून दुचाकी गाडीवर बसत असतानाच पाठीमागच्या बाजूकडून अचानक येऊन गावातील भागवत पांडुरंग जगदाळे (वय:४५) याने लाथ मारून गाडी व दामशेट्टी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दामशेट्टी यांनी मागील आठवड्यात विनामास्क फिरल्याबद्दल जगदाळे याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल केला होता. त्याचा राग म्हणून भागवत ने हे कृत्य केल्याची गावात चर्चा आहे. याप्रकरणी दामशेट्टी यांनी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकाराने कोरोना महामारीत जीव मुठीत काम करणारे ग्रामसेवक व अन्य सेवकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!