पोल्ट्री व्यवसायावरील ग्रामपंचायत कर आकारणी बंद करावी

फलटण तालुका पोल्ट्री मालक संघाची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२४ | फलटण |
पोल्ट्री व्यवसायावर ग्रामपंचायतीकडून कर आकारणी केली जात आहे. पोल्ट्री व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे शासनाने ही कर आकारणी माफ करावी, अशी मागणी फलटण तालुका पोल्ट्री मालक संघाच्या वतीने आज फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की, शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. हा कृषीपूरक व्यवसाय आहे. यावर ग्रामपंचायत निवासी कर आकारणी करत आहे. हा सरळ सरळ शेतकर्‍यांवर अन्याय आहे. शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणून आपल्या आर्थिक समृद्धीसाठी गोपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग यासारखे व्यवसाय करत आहे. तरीसुध्दा ग्रामपंचायत यावर निवासी कर लागू करत आहे.

कर्नाटक राज्यातील शेतकर्‍यांनी याबाबत हायकोर्टात न्याय मागितला असता, त्या कोर्टाने हा व्यवसाय शेतीपूरकच आहे, असा आदेश करून ग्रामपंचायतीने घेतलेला कर परत माघारी शेतकर्‍यांना द्यावा, असे सांगितले. त्यानुसार कर्नाटक राज्यातील शेतकर्‍यांना कर माफ झाला आहे.

आमच्या मागणीचा पाठपुरावा करून राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे याबाबत अर्ज करून आमच्या पोल्ट्री व्यवसायावरील कर माफ करावा, अशी मागणी पोल्ट्री मालक संघाने उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे.

निवेदन देताना पोल्ट्री मालक नागेश सपकाळ, गुलाब जगताप, इम्तियाज बागवान, महेश गोसावी, वैभव चोरमले, संताजी सस्ते, अजिंक्य मांढरे, शोएब आतार, कृष्णा शिंदे, सुधांशू डोंगरे, रामदास नलवडे, सचिन पवार, तेजस यादव, दादासो खांडे, पांडुरंग पवार, संदेश आढाव, वैभव साळुंखे, रोहित पवार हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!