
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०५ मे २०२२ । सातारा । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.
