स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोपीचंद तुम्ही गोपीनाथ व्हा

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, दुधेबावी : गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने नुकतीच विधानपरिषदेत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांना भाजपने संधी दिल्याने महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. पडळकर यांच्या घरात कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पूर्णवेळ राजकारण करत आज आमदार पदापर्यंत मजल मारली. हे त्यांच्या कष्टाचे त्यांना मिळालेले फळच आहे. मात्र दुसरी बाजू पाहता भाजपनेही धनगर समाजाला नेहमी प्रमाणे योग्य न्याय दिला आहे. त्या तुलनेत पाहता राष्ट्रवादी व काँग्रेसने धनगर समाजाला नेहमीच गंडवण्याची भूमिका घेतली आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने महादेव जानकर यांना विधान परिषदेत आमदार करून कँबिनेट मंत्री केले होते. तर राम शिंदे यांनाही राज्यमंत्री पद दिले होते. तर  राज्यसभेत डॉ. विकास महात्मे यांना संधी दिली होती. तसेच अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाचा मंत्री असलेल्या राम शिंदे यांच्या मतदार संघात जाऊन रोहित पवार यांना निवडून आणले. धनगर समाजाची भावना लक्षात घेऊन दुसर्‍या मतदार संघात त्यांनी निवडणूक लढायला पाहिजे होती. या सर्व बाबींचा विचार समाज बांधवांनी समाज म्हणून करायला हवा. धनगर समाज लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र त्या प्रमाणात राजकीय संधी दिली जात नाही. गोपीचंद पडळकर यांनी ती संधी स्वतः निर्माण केली आहे. त्यांची भाषण कला चांगली असल्याने आज त्यांच्या सभेला समाज बांधव मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

धनगर समाजात आजपर्यंत अनेक आमदार झाले, काही मंत्री झाले मात्र ते जास्त काळ राजकारणात राहू शकले नाहीत किंवा त्यांना राहू दिले नाही. त्यामध्ये गणपतराव देशमुख अपवाद आहेत. तेही शेकाप मध्ये होते म्हणून आणि त्यांनी धनगर समाजाचा मुद्दा धरला नव्हता म्हणून. तसे पाहता माजी मंत्री आण्णा डांगे यांनीही आपल्या कार्यकाळात  चांगली कामगिरी केली. धनगर समाजाला इतर पक्ष न्याय देत नाहीत त्यासाठी आपला स्वतः चा पक्ष असावा  हा योग्य मुद्दा घेऊन महादेव जानकर पुढे आले होते. मात्र त्यांनाही ते करता आले नाही. आरक्षणाच्या मुद्यावर ठाम न राहता तेही बदलले. मंत्रीपद मिळाल्यानंतर पक्ष वाढला पाहिजे होता, समाजातील लोक जवळ आले पाहिजे होते. मात्र तसे न होता आज उलटे चित्र पहायला मिळत आहे. आज भाजपची सत्ता राहिली नाही. मग जानकरांनी इथून पुढे काय करायचे. आता तर समाज व कार्यकर्ते बरोबर राहिले नाहीत. धनगर समाजाला कायम साथ देणारा व त्यांच्या सोबत राहणारा परमंनन्ट नेता पाहिजे. असा नेता मिळाला तर समाजाचेही भले होईल व त्या नेत्याचेही. एखादे पद मिळालेकी हुरळून जाऊन चुकीचे निर्णय घेतात व समाजाला विसरून जातात व नंतर पेन्शन खात बसतात. गोपीचंद पडळकर हा स्वयंभू नेता आहे. त्यांनी आजपर्यंत आपल्या आक्रमक भूमिकेने सर्व काही मिळवले आहे. हे करत असताना त्यांनी समाजहित पाहिले आहे. आतापर्यंतची त्यांची भूमिका चांगली आहे.

त्यांना भाजपने धनगर समाजाचा विचार करून विधान परिषदेत संधी दिली आहे. योग्य व्यक्तीची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर तरुण आहेत. त्यांना आगामी काळात काम करण्याची संधी आहे. धनगर समाजालाही त्यांच्या सारखा तडफदार नेता पाहिजे आहे. त्यांनीही या संधींचे सोने केले पाहिजे. भाजपचे गोपीनाथ मुंडे छोट्या समाजाचे होते मात्र त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन केल्यामुळे ते तमाम महाराष्ट्राचे नेते झाले होते. ओबीसीचा  नेता म्हणून त्यांची ओळख झाली होती. गोपीचंद पडळकर यांनी भविष्यात गोपीचंद न राहता गोपीनाथ व्हावे ही इच्छा व शुभेच्छा.


Tags: फलटणराज्यसंपादकीय
ADVERTISEMENT
Previous Post

कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

Next Post

नवीन नियमावली नुसार सातारा जिल्हा रेड झोनच्या बाहेर; जिल्ह्यातील दुकाने लवकरच सुरु होतील : श्रीमंत रामराजे

Next Post

नवीन नियमावली नुसार सातारा जिल्हा रेड झोनच्या बाहेर; जिल्ह्यातील दुकाने लवकरच सुरु होतील : श्रीमंत रामराजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

शेंद्रे ता. येथे मधुमक्षिका पालन शिबीराचे उदघाटन करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. शेजारी डी. आर. पाटील, निसार तांबोळी, श्रीमती हेमलता फडतरे व मान्यवर

मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय – सौ. वेदांतिकाराजे

March 2, 2021

एमजी मोटरद्वारे सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीची नोंद

March 2, 2021

वेधिक अ‍ॅकॅडमीमधून उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी घडावेत : आ.दीपक चव्हाण

March 2, 2021

अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा

March 2, 2021

राष्ट्रीय जंतनाशक मोहीमे अंतर्गत गोखळी येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

March 2, 2021

अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा केलेली असूनदेखील मोदी सरकार सामान्य लोकांकडून पैसे का घेत आहे? – श्री पृथ्वीराज चव्हाण  

March 2, 2021

ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असणाऱ्यांना कोविड लस देणे सातारा जिल्ह्यात सुरु; लस सुरक्षित, लस घेण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

March 2, 2021

फलटण तालुक्यातील ११ तर जिल्ह्यातील ९८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

March 2, 2021

12 आमदारांच्या नियुक्तीशिवाय वैधानिक विकास महामंडळे नाही, मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याचा अजित पवारांचा गाैप्यस्फोट

March 2, 2021

चतुर्थी’ या तिथीचे महत्त्व अन् गणेश पूजन आणि उपासना  यांसाठी निरनिराळ्या अवतारांतील त्याची नावे आणि कार्य !

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.