गुड थॉट्स : सुप्रभात…..आज १२ फेब्रुवारी… सृष्ट दृष्ट(दुष्ट) काय बनायचे?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सृष्टीच्या या भूतलावर काही मनुष्य प्रवृत्ती इतरांच्या कार्याचा विनाश करणे,उध्वस्त करणे,विनाशकालीन कृत्य हाच दुष्टांचा स्वभाव असतो. उंदीर स्वतःचे पोट भरण्यासाठी कपडे कुरतडत नसतो.त्याला त्याचा लाभ शून्य पण असूरी आनंद भेटतो.त्यामुळे अश्या प्रवृत्ती वाढत आहेत.

स्वत:चा लाभ नसला तरीही दुष्ट (दृष्ट) लोक इतरांचा नाश करू पाहतात. अश्या प्रवृत्ती वेळीच आवरल्या नाहीत तर समाज स्वास्थ्य बिघडत जाऊन उगवत्या पिढीला आपण कोणता वारसा देणार आहोत?

आपल्या वास्तू मधील दृष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारी छोट्या पडद्यावरील भडक मालिका प्रसरण जो पर्यंत सृष्ट प्रवृत्तीत रुपांतर होत नाही.तो पर्यंत आपणाला स्वास्थ्य लाभणार नाही.एक वेळा छोटा पडदा मोठ्या मुश्किलीने बंद (काही कालावधी ) केल्यास सृष्ट विचार परावृत्त होतील.पण सृष्टीतील मानवी जनुकांमधील दृष्ट(दुष्ट) विचार थोपविणे फार कठीण काम आहे.असे वाटतं नाही.
आपण प्रत्येक सृष्ट कृती करताना मागे ओढणारे,खेचणारे,निंदा नालस्ती करणारे,दोषाची राळ उडवणा-या दुष्ट प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी फणा काढण्याची जरुर नाही.तर आपल्या अनुभवाचा,कौशल्याचा,परिस्थिती हातळणे कसब,शांत,संयमी भूमिका व आपल्या सृष्ट विचारांशी प्रामाणिक राहिल्यास दुष्ट प्रवृत्ती बळवणार नाहीत.सकारात्मकता ,निग्रह,संस्कार,ध्येय युक्त दिशा व कृतीची जोड दिल्यास सृष्ट विजयी भवच.

सृष्ट संख्येच्या मानाने दृष्ट संख्या जास्त आहे.म्हणून खचून न जातात कार्यरत राहिल्यास समाजिक स्वास्थ्य अबाधित राहणार.

ता.क.आज माघ मासारंभ…सूर्यनारायण उपासना सुरु

दृष्टादृष्टविजयें

आपलाच सृष्ट प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!