गुड थॉट्स : सुप्रभात…..आज १९ फेब्रुवारी… शिवविचार जगात भारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध पद्धतीने साजरी केली जाते.तरुणाई गड, कोट ,किल्ले ,दुर्ग या ठिकाणाहून प्रज्वलीत शिवज्योत आणून स्वतःच्या मनात चैतन्य निर्माण करतात.युवा पिढीने किल्ले जतन व संवर्धन काम हाती घ्यावे.तेथील स्वच्छता ,डागडुजीपणा,श्रमदान याचबरोबर अयोग्य कृतींना पायबंद घालणे.शिवज्योतीच्या वेळी दोनचार संवगड्यामुळे अनुचित प्रकार न घडता पावित्र्य जपले पाहिजे .

डीजे चा कर्णकर्कश आवाज लावून धांगडधिंगा घालून शिव उत्सव साजरा करण्यापरीस पारंपारिक वाद्य गजरात शाही पालखी सोहळा काढावा.सनई चौघडे,टफडं पिपाणी,शिंग तुतारी,डफ तुणंतुण,लेझीम,झांज पथक,तलवारी कसरत यातून हर हर महादेव ची गर्जना करुन जोश आणावा.त्यामुळे पारंपारिक वाद्यवृंद व कलाकारांना प्रेरणा मिळेल .
शिव प्रतिमा पूजन,शिवज्योत,शाही पालखी सोहळा,व्याख्याने,शाहिरी,पोवाडे,अन्नदान याबरोबरच शिवजयंतीला रक्तदान,ग्रंथदान,वाचनालय,व्यायाम शाळा,ज्ञानमंदीर उभारणी,होतकरु विद्यार्थी दत्तक योजना,कन्या सन्मान,बळीराजा आधार हे लोकहिताचे उपक्रम राबविणे.

आपणा प्रत्येकाला शिवाजी माहाराजांचा अभिमान आहे.पण भावनेच्या भरात आपण दुचाकी अथवा चारचाकी वहानांवर शिवप्रतिमा,भगवा लावून मिरवत असताना पावित्र्य जपणे महत्वाचे आहे.कपाळाला चंद्रकोर,वेशभूषा,गळ्यात शिवप्रतिमा वापरताना काळजीपूर्वक त्या प्रतिमांचा आदर करावा. खरं तर शिवचैतन्य नसानसांत भिनले पाहिजे.

शूर मावळे तानाजी,येसाजी,बाजी,जीवा ,शिवा या मावळ्यांची कर्तबगारी रक्तात भिनली पाहिजे.शिव चरित्र व चारित्र्य आपण जपले पाहिजे.नव्या पिढीला पर्यटना बरोबरच वैभवशाली गड ,कोट, दुर्ग, किल्ले यांचे दर्शन व जबाबदारीचे भान देणे गरजेचे आहे.महापुरुषांची जयंती जातीच्या चौकटीत बंदिस्त करुन साजरी करण्यापरीस सर्वांना समावून घेणे.
आज तलवारी व ढाल याची जरुर नसून शिवमहिमा उगवत्या पिढीला देताना लेखणी व गनिमी कावा याचे बाळकडू देणे काळाची गरज आहे.

ता.क.आज रथसप्तमी ….संसाररुपी रथांच्या दोन चाकांनी सप्तपदीनुसार आचरण करुन मी पणाचा त्याग म्हणजे रथसप्तमी होय.

शिवबा बरोबरच जिजाऊ(कन्यारत्न) जन्माच स्वागत हीच शिवजयंती

आपलाच शिवमय प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!