
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 18 मार्च, सातारा : अन्न व औषध प्रशासन याच्यांतर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते कि, दिवसेंदिवस वाढत जाणा-या उष्णतेमुळे ग्राहकांकडून शीतपेय, पाण्याच्या बाटल्या आईस्क्रीम, कुल्फी यांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी, आपल्या दुकानात विक्रीकरिता साठवलेली शीतपेये, पाण्याच्या बाटल्या, आईसक्रिम, कुल्फी, दुग्धजन्य पेय परवाना धारक पुरवठा धारकाकडूनच खरेदी करावे. तसेच त्यांची साठवणूक स्वच्छ ठिकाणी सावलीमध्ये नियंत्रित तापमानात करावी. मुदतबाह्य अन्नपदार्थ विकीकरिता साठवू नयेत. कोणत्याही ग्राहकांनीही अन्नपदार्थ खरेदी करताना परवाना धारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. अन्नपदार्थ खरेदी करताना मुदतबाह्य नाही याची खात्री करुनच खरेदी करावे. एखाद्या पदार्थाबाबत तकार असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क करावा ,असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन सातारा सं.पा. शिंदे यांनी केले आहे.
