शुक्रवार पेठेमध्ये अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येपूर्वी आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । सातारा । गावी गेलेल्या आईला आज सकाळी फोन करत वाढ दिवसाच्या शुभेच्छा देऊन साताऱ्यामधील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनीत राहणाऱ्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत शाहूपुरी पोलीस आणि स्थानिकांसह निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन हा आई आणि वडील यांच्यासमवेत जिजामाता कॉलनीत राहण्यास होता. त्याचे मूळगाव आसनगाव असून आई-वडील काल तिकडे शेतीकामासाठी गेले होते. घरी एकटा असणाऱ्या मुलानं आज सकाळी फोन करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यानंतर गळफास घेतला .

त्यानं गळफास घेतल्याचे शेजारी राहणाऱ्या काही जणांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी याची माहिती मुलाच्या कुटुंबीयांना दिली. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. अल्पवयीन मुलगा हा सातारा येथील एका महाविद्यालयात 11 वीत शिकत होता. त्याचे वडील शिक्षक असून एकुलत्या मुलानं आत्महत्या केल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Back to top button
Don`t copy text!