स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२१: देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणा-या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी अप्रेंटीसची संधी दिली आहे. एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ‘एसबीआय डॉट को डॉट इन’वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा.

एसबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसार इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील.

एसबीआय अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!