
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 27 नोव्हेंबर 2024 । फलटण । छत्रपती शहाजी महाविद्यालय,कोल्हापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय बॉक्सिंग (मुले/मुली) स्पर्धा सन 2024-25 मध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटण मधील कु.गीतांजली बंडगर हिने 60-63 किलो वजन गटात तर कु. ऋतुजा तांबे हिने 46 – 48 वजन गटात विजय संपादन करुन सुवर्णपदक पटकावले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
