कापशीत भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 27 नोव्हेंबर 2024 । फलटण । कापशी (ता.फलटण) गावचे जागृत देवस्थान श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरामध्ये श्री भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा झाला.

जन्माष्टमीनिमित्त देवस्थानचे मानकरी, पुजारी व ग्रामस्थांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली.

या जन्मकाळ उत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!