ज्ञानदा निंबाळकरचे सेट परीक्षेत यश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील स्वर्गीय मोतिराम मारुतराव निंबाळकर यांची नात व मुधाईदेवी विद्यामंदिर देऊर या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य करत असणारे प्रा. विजयकुमार निंबाळकर यांची कन्या कु. ज्ञानदा निंबाळकर हिने नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले. त्याबद्दल तिचा सत्कार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मालोजीराजे सहकारी बँकेचे निवृत्त व्यवस्थापक बबनराव निंबाळकर, प्रा. विजयकुमार निंबाळकर, धनराज निंबाळकर, ज्ञानेश निंबाळकर उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!