
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर या संदर्भातील आदेश जारी झाले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १ जुलै : फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस दलातील वरिष्ठ पातळीवरून नुकतेच या बदल्यांचे आणि नियुक्तीचे अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत.
फलटण शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आता बल्लाळ यांच्यावर असणार आहे. नूतन पोलीस निरीक्षक म्हणून ते लवकरच आपला पदभार स्वीकारतील. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर या महत्त्वपूर्ण पदावर बल्लाळ यांची वर्णी लागली आहे.
