शासनाच्या योजनांची तंतोतंत माहिती मिळाली – महिला कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । पुणे । ‘शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची तंतोतंत माहिती एकाच ठिकाणी पहायला मिळाली. प्रदर्शनाची कल्पना खूप सुंदर!’ अशी प्रतिक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत विभागीय माहिती कार्यालयामार्फत आयोजित प्रदर्शन पहायला आलेल्या महिला स्वच्छता कर्मचारी  योगिता पंडित यांनी व्यक्त केली.
 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनामुळे महिला व बालविकास, कामगारांच्या  योजना, शेतीविषयक माहिती, आदिवासींच्या अशा विविध  योजनांची माहिती मिळाली. हे प्रदर्शन खूपच माहितीपूर्ण असून उपयोगी आहे. आमच्या १२-१३  सहकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात साध्या व सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. आम्हाला उपयुक्त पडतील अशा यापूर्वी माहित नसलेल्या योजनांची माहिती मिळाल्याने त्यांचा लाभ घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असेही श्रीमती पंडित म्हणाल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!