गणेशोत्सवात सजावटीला महागाईची झळ; कागदी मखर अन् एलईडी दिव्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वधारले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत कागदी मखर आणि आधुनिक एलईडी दिव्यांचे विविध प्रकार दाखल झाले असून वाढत्या महागाईमुळे सजावट साहित्याचे भाव वधारले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ०९ सप्टेंबर : बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यावरणपूरक कागदी मखर आणि आकर्षक एलईडी दिव्यांची नवी श्रेणी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असली, तरी कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्याने यंदा सजावटीचे साहित्य १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे.

पर्यावरणपूरक कागदी मखरांना वाढती पसंती

थर्माकोल आणि प्लास्टिकवरील बंदीनंतर यंदा बाजारात विविध रंगांतील घडीचे कागदी मखर, लाकडी आरास आणि कापडी पडद्यांची मोठी श्रेणी उपलब्ध झाली आहे. फोल्डिंग स्वरूपातील कागदी मंदिरे आणि मखर उभारणीस अत्यंत सोपे असल्याने नोकरदार वर्गाकडून या प्रकाराला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. मात्र कागदाच्या वाढत्या किमतींमुळे या मखरांच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत थेट वाढ झाली आहे.

आधुनिक एलईडी लाईट्स अन् रोषणाई महागली

सजावटीमध्ये रंगत आणणाऱ्या विद्युत रोषणाईत भारतीय बनावटीच्या फॅन्सी एलईडी माळा, पडदे आणि कर्टन लाईट्सचा ट्रेंड दिसून येत आहे. स्टार, कमळ, समयी आणि मल्टिकलर सिस्टीम असणाऱ्या दिव्यांना मागणी असून हे दिवे वीज बचतीसाठीही उपयुक्त ठरत आहेत. मात्र उत्पादन खर्च आणि वाहतूक भाडे वाढल्याने रोषणाईच्या साहित्यातही १० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!