दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२३ | फलटण |
गुणवरे (ता. फलटण) पंचक्रोशीतील स्त्री-पुरूष व लहान मुलांसाठी दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्ट फलटण, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, माऊली फाऊंडेशन मुंबई, लायन्स क्लब फलटण, लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल फलटण, फलटण ब्लड बँक, जैन सोशल ग्रुप व गुणवरे ग्रामपंचायतीतर्फे शनिवार, दि. २५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेदरम्यान मोफत आरोग्य तपासणी, उपचार, मोफत चष्मे वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुणवरे विकास सोसायटी हॉल, भैरवनाथ पेट्रोल पंपासमोर, गुणवरे येथे आयोजित केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या हस्ते होणार असून शिबिरात डॉ. जे.टी. पोळ, डॉ. राजस गांधी, डॉ. कल्याण नाळे डॉ. गुंजन गांधी, डॉ. अमोल नाळे, डॉ. निखिल गावडे, डॉ. भारत पोंदकुले, डॉ. अशोक व्होरा आदी तज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार आहेत.
शिबिरातील रक्तदात्यास हेल्मेट किंवा टिफीन भेटवस्तू देण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.