दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन दि.२१ जून रोजी फलटण नगरीमध्ये झाले. यावेळी समर्थ प्रतिष्ठान फलटण व संत रोहिदास संत चॅरिटेबल ट्रस्ट फलटण यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तसेच वारकर्यांना जेवण, चहा, पोहे, बिस्किट, झंडू बाम व ३९६ रुपयात अपघाती १० लाख रुपयांचा इंडियन पोस्ट विमा काढण्यात आला.
यावेळी मुधोजी महाविद्यालय फलटणचे उपप्राचार्य दीक्षित सर यांच्या हस्ते कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. या कॅम्पला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न यावेळी समर्थ प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला. समर्थ प्रतिष्ठान फलटण शहर व तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवून ठसा उमटवत आहे. वारकर्यांच्या सेवेत प्रत्येक वर्षी समर्थ प्रतिष्ठान सज्ज असते, असे गणेश भोईटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भोलेनाथ भोईटे, रोहिदास पवार, संतोष कांबळे, अशोक भगत, संतोष पोटफोडे, प्राचार्य हंकारे सर, बापू बनकर, कैलास सोडमिशे, अमित साळुंखे, रमेश भोईटे, संतोष दगडे, रुपेश नेरकर, सूर्याजी जगताप, संतोष भोईटे, बाळकृष्ण जाधव, मधु बनकर, अशोक जाधव, गणेश ननवरे, सचिन भुजबळ, अजित पोकळे, अनिल करचे, राहुल शिदे, सागर होले, विठ्ठल बनकर, जरइम्तियाज रंगरेज, मोरेश्वर जाधव, बाळू घाडगे, सचिन वाघ, अनिल करचे, सागर भोईटे, दीपक ठोंबरे, डॉ. देशपाडे, उदय भोसले, अमोल काकडे, वेंकटेश भोईटे आदी समर्थ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.