खंडाळा तालुक्यात उत्पादन शुल्कच्या धाडी चारजणाना अटक, 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


स्थैर्य, सातारा, दि.१६: खंडाळा तालुक्यातील शेखमीरवाडी, शिरवळ ,  आसवली येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गावठी दारूच्या  अड्ड्यांवर छापे टाकून 6 लाख 19 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या  छाप्यात चारजणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र राजेंद्र कुंभार रा.  शेखमीरवाडी, ता. खंडाळा, आदेश अनिल कुंभार रा.धनगरवाडी ता.खंडाळा,  राहुल संजय पवार रा.लिंब ता.सातारा, वैभव संजय सोनमळे रा.लिंब ता.सातारा  अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा विभागातील भरारी  पथकाने विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार राज्य (कोल्हापूर विभाग) व  अधीक्षक अनिल चासकर (सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली शेखमीरवाडी,  शिरवळ व आसवली  याठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारु विक्री व  वाहतूकीवर छापे टाकले. या छाप्यात एक चारचाकी, एक दुचाकीसह 703  लिटर हातभट्टी दारु असा एकूण 6 लाख 19 हजार 290 रुपयांचा मुद्येमाल  जप्त करण्यात आला आहे. तसेच सुरेंद्र राजेंद्र कुंभार, आदेश अनिल कुंभार,  राहुल संजय पवार आणि वैभव संजय सोनमळे यांना अटक करण्यात आली  आहे.या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर,  अजित रसाळ, सचिन खाडे, महेश मोहिते, संतोष निकम, जीवन शिर्के, नितीन  जाधव, किरण जंगम यांनी भाग घेतला. पुढील तपास नंदू क्षीरसागर दुय्यम निरीक्षक करत आहेत.

बनावट मद्य, हातभट्टी दारू आढळल्यास व त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयास तात्काळ  देण्यात यावी असे आवाहन अनिल चासकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!