शनिवारी गजानन चौकात शरद पवारांची सभा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक प्रल्हाद चव्हाण यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी फलटण येथील गजानन चौक येथे करण्यात आले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगनतदार होत चालला आहे. फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष्याच्या वतीने अनेक दिग्गज मान्यवर प्रचार करीत आहेत. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विधानसभेचे उमेदवार दिपक चव्हाण यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. श्रीमंत संजीवराजे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन दिपक चव्हाण यांच्या प्रचाराच्या बैठका घेत आहेत. यासोबतच युवराज श्रीमंत अनिकेतराजे व युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे यांनी फलटण शहर व उपनगरांमध्ये हाऊस टू हाऊस प्रचार करत दिपक चव्हाण यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.

फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात जात तरुण व युवकांची नवी फळी राजे गटासोबत जोडली आहे. श्रीमंत विश्वजितराजे यांनी सुद्धा फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात जात नव युवकांना व नवमतदारांना श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून गत ३० वर्षांमध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा सांगून नवयुवक व नवमतदार हे राजेगटाकडे जोडत आहेत.

यामध्येच देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांची सुद्धा दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!