
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑक्टोबर 2024 | फलटण | आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षांतर झाल्यानंतर संध्याकाळी लगेचच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उद्या दि. 14 रोजी गजानन चौक येथे सायंकाळी 6 वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जाहीर सभेस ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, भाजपा विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरात व तालुक्यात विविध विकासकामे मंजूर करून आणली असून त्याचे भूमिपूजन समारंभ उद्या संपन्न होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली आहे.
