मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची सोय : अनुप शहा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा देण्यासाठी फॉर्म भरण्यात येणार आहेत. ज्यांना फॉर्म भरायचे आहेत. त्यांनी अनुप शहा यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा; असे आवाहन फलटण शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनुप शहा यांनी केले.

या योजनेनुसार जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात शासनाकडून देण्यात येणार आहे. याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. फॉर्म भरण्यासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुक शक्य असल्यास शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घेऊन यायचे आहेत.

सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सदरचे फॉर्म भरले जाणार असून पात्र व इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा; अधिक माहितीसाठी नागरिकांनी अनुप शहा यांच्याकडे दूरध्वनी नंबर 9689941008 या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!