दैनिक स्थैर्य | दि. 21 जुन 2024 | फलटण | फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये कार्यरत असताना “स्थैर्य”ने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अगदी डिजिटल मीडियामध्ये सुद्धा दैनिक “स्थैर्य”चे कामकाज हे गौरवास्पद असल्याचे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील दैनिक “स्थैर्य”च्या मुख्य कार्यालयास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे – पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, लतिफ तांबोळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; फलटण तालुक्याच्या पत्रकारितेमध्ये “स्थैर्य”चे स्वतंत्र असे अस्तित्व आहे. “स्थैर्य”चा मोठ्या प्रमाणावर वाचक वर्ग आहे. फलटणकरांच्या पसंतीस “स्थैर्य” उतरले आहे. डिजिटल मीडियामध्ये सुद्धा “स्थैर्य”ने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. फलटण सारख्या निमशहरी भागामध्ये पत्रकारितेत काम करताना अनेक अडीअडचणींना सामना हा नेहमीच करावा लागतो. अश्या अडीअडचणी वर मात करत “स्थैर्य”ची वाटचाल दिमाखात सुरू आहे.”स्थैर्य”चे संस्थापक स्व. दिलीप रूद्रभटे यांनी आखून दिलेल्या मार्गावर “स्थैर्य”ची वाटचाल सुरू आहे.