
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । मुंबई । दक्षिण मुंबईतील बोहरी मोहल्ला येथील इमारतीचे बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून मोहम्मद विश्वरवी अब्दुल सय्यद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना सात लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
दक्षिण मुंबईतील बोहरी मोहल्ला, भेंडीबाजार येथील इमारतीचे बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत सदस्य रवींद्र वायकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, कमीत कमी 90 दिवस काम केले असल्यास कामगार कल्याण मंडळात नोंदणी करण्यात येते. परंतु मृत कामगाराचे प्रत्यक्ष क्षेत्रात नियमानुसार कामाचे दिवस पूर्ण न झाल्याने नोंदणी करण्यात आली नव्हती. अपघातासंदर्भात संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना यापुढे घडू नये, यासंदर्भात दक्षता घेण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले असल्याची माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
