अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२६ | मुंबई |
महाराष्ट्रातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रक्रियेत दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते. मात्र, सुधारित वेळापत्रकामुळे अंतिम यादी प्रसिद्ध होण्यास जवळपास महिनाभराचा विलंब झाला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रियाही पुढे ढकलण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्वी २९ जुलैपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. आता ती २४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, बूथ लेव्हल अधिकार्‍यांमार्फत (बीएलओ) करण्यात आलेली घराघरातील मतदार पडताळणीची प्रक्रिया १७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. या मोहिमेदरम्यान राज्यातील विविध भागांतील मतदारांच्या घरी भेट देऊन बीएलओनी मतदारांकडून एन्युमरेशन फॉर्म जमा केले. या प्रक्रियेची मुदत निवडणूक आयोगाने यापूर्वी वाढवली होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!