
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, सातारा, दि. 20 : शेळकेवाडी ता.सातारा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीच्या वडिलांनी हि फिर्याद दाखल केली आहे.
गुरुवारी रात्री घरातील सर्व जेवण करून झोपले.रात्री उशिरा मुलीची आई उठली असता घरात अल्पवयीन मुलगी नसल्याचे निदर्शनास आले.मुलीच्या कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने शुक्रवारी त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.



