पुणे-पंढरपूर महामार्गावर काळज नजीक भीषण अपघात; चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुणे-पंढरपूर महामार्गावर फलटण तालुक्यातील काळज गावच्या हद्दीत हॉटेल कृष्णाईसमोर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ५ एप्रिल : पुणे-पंढरपूर महामार्गावर फलटण तालुक्यातील काळज गावच्या हद्दीत एका भीषण रस्ते अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काळज नजीक असलेल्या हॉटेल कृष्णाईसमोर भरधाव चारचाकीने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-पंढरपूर महामार्गावरून प्रवास करत असताना काळज हद्दीतील हॉटेल कृष्णाईसमोर हा अपघात घडला. एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर जोराने आदळले. गंभीर दुखापत झाल्याने या दोघांचेही घटनास्थळीच निधन झाले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांची ओळख पटवण्याचे काम आणि पुढील कायदेशीर कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!