एनसीएलटीने नाकारलेले शेतकऱ्यांचे क्लेम दत्त इंडियाकडून अदा; श्रीमंत रामराजेंच्या हस्ते धनादेश प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२४ | फलटण | पूर्वी असलेल्या न्यू फलटण शुगरच्या काळातील २०१७/१८ साली गळीतास आलेल्या उसाची बिले ज्या शेतकऱ्यांनी एनसीएलटी मध्ये क्लेम केले नव्हते अथवा काही तांत्रिक कारणामुळे एनसीएलटीकडून शेतकऱ्यांचे क्लेम नाकारण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांना श्रीदत्त इंडिया कडून थकीत ऊस बिलाच्या ५० टक्के रक्कम विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आले.

सन २०१७/१८ साली कारखाना बंद झाल्यानंतर हा कारखाना एनसीएलटी च्या माध्यमातून श्री दत्त इंडिया कंपनीने विकत घेतला होता व त्यावेळी शेतकऱ्यांचे एननसीएलटी नियमानुसार ऊस बिले अदा केली होती. मात्र काही शेतकऱ्यांनी एनसीएलटी मध्ये क्लेम केले नव्हते व काही शेतकऱ्यांचे क्लेम तांत्रिक अडचणीमुळे नाकारण्यात आले होते अशा शेतकऱ्यांपैकी ज्यांनी २०२३/२४ हंगामात आपला ऊस श्री दत्त इंडिया कारखान्याला गाळपास दिला आहे. अशा शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलाच्या ५० टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे व जे शेतकरी मागील हंगामा प्रमाणे यावर्षी सुद्धा आगामी हंगामामध्ये कारखान्याला आपला ऊस प्राधान्याने घालतील अशा शेतकऱ्यांनासुद्धा उर्वरित पन्नास टक्के रक्कम देणार असल्याचे यावेळी कारखान्याचे संचालक जितेंद्र धारू यांनी सांगितले आहे.

साखरवाडी येथील कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात १७ शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, पंचायत समितीचे माजी सदस्य किरण साळुंखे पाटील, साखरवाडीचे माजी सरपंच सुरेश भोसले,सतीश माने,संजय भोसले,अभंयसिंह नाईक निंबाळकर,ओंकार भोसले,योगेश माडकर,सचिन भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले,गोरख भोसले,पोपट भोसले, पै संतोष भोसले, ग्रामपंचायतचे सदस्य मच्छिंद्र भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!