
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळा, आसनगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच सौ. हेमलता संतोष शिंदे, उपसरपंच श्री. किशोर हनुमंत शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल झेंडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषीदूत यांना हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्राचार्य स्वप्निल लाळगे सर तसेच कार्यक्रम समन्वयक प्राचार्या निलिमा धालपे मॅडम व प्राचार्य नितिशा पंडित मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
