ललगुण येथे कृषीदूतांनी साजरा केला ‘महाराष्ट्र कृषी दिन’


दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२४ | फलटण |
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदूतांनी ललगुण येथे जिल्हा परिषद शाळेत जाऊन ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा केला.

यावेळी कृषीदूत व कृषी अधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कृषिदिन आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी व शेतीचे महत्त्व सांगून प्रत्येक विद्यार्थ्यांने कमीतकमी एकतरी झाड लावावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणत्या विभागात कोणती पिकं घेतली जातात याची माहिती दिली. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

कृषी दिनानिमित्त कृषी अधिकारी अमोल चोरमले व कृषी अधिकारी सागर लाळगे व शाळेचे मुख्याध्यापक अरुण आवळे सर, केशव वानखेडे सर, विश्वास चौधरी सर, सुनील मदने सर, कमलेश पाटील सर, गावित मॅडम, पवार मॅडम, फडतरे मॅडम, माळी मॅडम, व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल काटकर, उपाध्यक्ष मिनाक्षी घाडगे, पंकज घाडगे, मोहिनी अडसूळ, सागर मेहेत्रे, गणेश काटकर व अभिजीत घाडगे उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हा कार्यक्रम पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!