मोरवे ता. खंडाळा येथे श्री ज्ञानोबा हिंगमिरे देव यांच्या जन्मदिनानिमित्त प्रसिद्ध ॐ काली श्री कालीचरण महाराज यांचे प्रवचन व भजन


दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । फलटण । भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सदगुरू, श्री ज्ञानोबा विश्वनाथ हिंगमिरे देव यांच्या जन्मदिनानिमित्त मोर्वे ता. खंडाळा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी प्रसिद्ध ॐ काली श्री कालीचरण महाराज यांचे प्रवचन व भजन होणार आहे.

रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ६.३० ते रात्री ८.३० या कालावधीत श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे, ता. खंडाळा येथे हे कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये सकाळी ६.३० ते १० व दुपारी ३ ते ४ या वेळेमध्ये श्रींना रूद्र अभिषेक श्री सदगुरू देवांना ५२ पात्री अभिषेक, १०८ श्री महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सुप्रसिद्ध ॐ काली कालीचरण महाराज यांचे प्रवचन व भजन होणार आहे. सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत श्री सदगुरू हिंगमिरे देवांचा जन्मदिन सोहळ्याचा कार्यक्रम व त्यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री साई समर्थ भजनी मंडळ, कोल्हापूर यांची भजनसेवा होणार आहे.

तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे यांचेवतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!