सातारा पालिकेकडून दोन ठिकाणी कोवीड लसीकरणाची सोय


स्थैर्य,सातारा, दि. ४:  राज्य शासनाने 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरणास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर साताा पालिकेने पुज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, राजवाडा व कै.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोडोली अशा दोन ठिकाणी मोफत लसीकरणाची व्यवस्था केली आहे. राज्य शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 45 ते 60 वर्ष वयोगटात असणारे ज्यांना मधुमेह व रक्तदाब (कोमआरबीड)चा त्रास आहे तसेच 60 वर्षावरील वयोवृध्द नागरीकांना लस दिली जाणार आहे. सातारा नगर परिषदेने पुज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, राजवाडा व कै. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोडोली अशा दोन ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळता दररोज (सोमवार ते शनिवार) सकाळी 10 ते संध्याकाळी 5 यावेळेमध्ये मोफत लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे. 45 ते 60 वर्ष वयोगटात असणारे ज्यांना मधुमेह व रक्तदाब (कोमआरबीड) व 60 वर्षावरील वयोवृद्धांनी या मोफत असणार्‍या लसीचा लाभ घ्यावा व लसीकरणासाठी येताना आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. माधवी संजोग कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!