फिटनेस टेस्ट घेताना रिक्षाला अपघात आरटीओ कार्यालयातील घटना : वाहन निरीक्षक जखमी


स्थैर्य, सातारा, दि. ०४: सातारा येथील आरटीओ कार्यालयात फिटनेस टेस्ट देण्यासाठी आलेल्या रिक्षाचीटेस्ट घेताना बे्रक लागल्याने रिक्षा भिंतीला धडकून अपघात झाला. या अपघातात वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी हे जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी, सातारा येथील परिवहन विभागाच्या (आरटीओ) परिसरात आज दुपारी दुपारी वाहनांची फिटनेस टेस्ट सुरू होती. मोटार वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी हे रिक्षाची टेस्ट घेत  होते. यावेळी ब्रेक लागला नाही. त्यामुळे जवळच असलेल्या भिंतीला रिक्षा धडकली. या अपघातात कुलकर्णी जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला आणि मांडीला जखम झाली. अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


Back to top button
Don`t copy text!