मेसेज फॉरवर्डिंगवर फेसबुकचीही मर्यादा, एकावेळी फक्त पाच जणांना मेसेज पाठवता येणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि.५: संदेश अग्रेषित (फॉरवर्डिंग मेसेज) करण्याच्या संख्येवर फेसबुकने मर्यादा घातली असून आता एकाचे वळी पाच जणांना किंवा ग्रुपला मेसेज पाठविता येईल. मेसेज फॉरवर्ड करण्याची संख्या मर्यादित करण्यात आल्याने चुकीच्या माहितीचा प्रसार होण्यास आळा बसेल आणि वास्तव जगात कमी नुकसान होईल, असे फेसबुकने म्हटले आहे.

खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मयार्दा घातली आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे. यामुळे एखादा मेसेज एकाच वेळी मर्यादित लोकांनाच पाठविता येईल. या नवीन सुविधेची चाचणी फेसबुकने मार्चपासून सुरू केली होती. २४ सप्टेंबरपासून जगभर ही सुविधा लागू केली जाईल. यामुळे ऑनलाईन वावरताना लोक सुरक्षित राहतील, असा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे.

लोकांना सुरक्षितता आणि खासगी मेसेजचा अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ही नवीन पद्धत सुरू करीत आहोत. चुकीची आणि नुकसानकारक माहिती, संदेशाच्या प्रसाराला आळा घालण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!