
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, फलटण, दि.१४ : आज रात्री पाऊसाचा जोर वाढल्यामुळे बाणगंगा नदीला काही वेळात (आज रात्री) मोठा पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रयास जाऊन प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेली आहे.



