दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कृती आराखडा जाहीर; शाळा बनणार ‘शैक्षणिक आधार केंद्र’

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सर्वसमावेशक शैक्षणिक कृती आराखडा जाहीर करण्यात आला असून, शाळांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑक्टोबर : महाराष्ट्रातील ३०५ तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये तसेच त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित राहावे, यासाठी एक सर्वसमावेशक शैक्षणिक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. याद्वारे प्रत्येक शाळेला ‘शैक्षणिक आधार केंद्र’ म्हणून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शैक्षणिक सातत्य टिकवण्यावर भर

दीर्घकालीन पर्जन्यमानातील तूट आणि जलसाठ्यावरील ताणामamil ग्रामीण भागातील शेती व जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांना आर्थिक विवंचनेमुळे किंवा स्थलांतरामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती टिकवून ठेवणे, त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि शाळाबाह्य होण्यापासून रोखणे हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या यामध्ये निश्चित करण्यात आल्या आहेत.

मानसिक आधार आणि पाणी व्यवस्थापनाचे पाठबळ

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जलव्यवस्थापनाच्या व सामाजिक कार्याच्या प्रेरणा घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यांना भावनिक व मानसिक आधार दिला जाणार आहे. तसेच शाळांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देत आपत्कालीन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदा व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!