लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील एकल महिलांसाठी लवकरच नवी योजना येणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील एकल महिलांच्या कल्याणासाठी एक विशेष योजना आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑक्टोबर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वी ठरल्यानंतर राज्य शासनाने आता राज्यातील एकल महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील एकल महिला आणि ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासाठी शासन लवकरच एक नवी योजना सुरू करणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सर्वेक्षणात समोर आली आकडेवारी

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, राज्यभरात शाळा व महाविद्यालयांमधील वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या सर्व्हेक्षणादरम्यान राज्यात सुमारे ३ लाख एकल महिलांची नोंद झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात अशा १२ लाखांहून अधिक एकल महिला असल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांच्या संघर्षाला शासनाचा आधार

कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकटीने सांभाळणाऱ्या आणि संकटांचा सामना करणाऱ्या महिलांच्या पाठीशी शासनाने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच एकल महिलांसाठी येत्या काळात ही नवीन योजना फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून याद्वारे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!