तडवळेतील महिलांकडून माजी खासदार रणजितसिंह यांचे औक्षण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी तडवळे (ता. फलटण) या गावी भेट दिली. राज्य सरकारने महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविल्यामुळे तालुक्यातील महिला आनंदी आहेत. त्यामुळे तडवळे गावातील महिलांनी माजी खासदार रणजितसिंह यांना थांबवून त्यांचे औक्षण केले व राज्य शासनाचे आभार मानले.

यावेळी पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी व तालुक्याचा आमदार सचिन पाटील यांना करण्यासाठी आम्ही महिला ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी महिलांनी रणजितसिंह यांना दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते डी. के. पवार, भाजप नेते विश्वासराव भोसले उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!