
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कोरोना बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. शहर व तालुक्यातील गेल्या १५ दिवसात जे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संपर्कात आलेले आहेत अश्या सर्वांनी स्वतःला ७ दिवस होम क्वारंटाइन करावे व ८ व्या दिवशी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी, जे कोणी होम क्वारंटाइन होतील त्यांनी नगर पालिकेस आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे कार्यालयात कळवावे असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रकृती उत्तम असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे.
