फलटण पंचायत समितीमध्ये कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन : गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २९ : सध्या फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातुन कोरोनाला आळा घालण्यासाठी फलटण पंचायत समिती येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करावा व तालुक्यातील सर्व सरकारी, खाजगी हॉस्पिटलमधील अपडेटेड माहिती ठेवण्यात यावी. फलटण तालुक्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणा बाबत सुध्दा अद्यावत माहिती कोरोना नियंत्रण कक्षाकडे ठेवण्यात यावी, असे आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काही दिवसांपूर्वी दिलेले होते. त्यानंतर लगेचच फलटण पंचायत समिती येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी दिलेली आहे.

कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून फलटण पंचायत समिती येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी जे. ऐ. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची माहिती गोळा करून तेथील दैनंदिन अहवाल तयार करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये बरड, गिरवी व बीबी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गणेश भगवान तांबे यांची नियुक्ती केली आहे. तर राजाळे, साखरवाडी, तरडगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भगवान यशवंत खताळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सोबतच फलटण येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अनिल काशिनाथ चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.

सदर नेमुन दिलेल्या अधिकारी व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होत असलेल्या रॅपीड व आरटीपीआर तपासणींचे अहवाल तयार करणे. कोरोना केअर सेंटरमधील बेड्सची अद्यावत माहिती घेणे. सरकारी व खाजगी हॉस्पिटलमधील बेड्सची अद्यावत माहिती घेणे व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती घेणे. दैनंदिन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती घेणे व अहवाल तयार करणे, ह्या स्वरूपात कामकाज करण्याचे आदेश हे फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी दिलेले आहेत.


Back to top button
Don`t copy text!