
स्थैर्य, फलटण : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. जगभरात गेल्या दोन-तीन महिन्यांत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसली आहेत. कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लाल होऊन दुखू लागतो. म्हणूनच कोव्हिड-19 ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजेच घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचे २३ नव्या रुग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने फलटण तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. २३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.