अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फलटणच्या कणसे हुंडाईला भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटणच्या मेकॅनिकल डिप्लोमा शाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी कणसे हुंडाईच्या फलटण येथील शो-रुमला भेट देवून सेल्स व सर्व्हिस संबंधीच्या सर्व कामकाजाची पाहणी केली. यावेळी हुंडाई कंपनीचे विक्री व विपणन विभागाचे अधिकारी नकुल ऐमा व अक्षय पैलवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिक भेटी प्रसंगी मिळालेल्या कामकाजाच्या सविस्तर माहितीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. कणसे हुंडाईच्या फलटण शाखेचे व्यवस्थापक सुशांत नलवडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!