इमामीने मसाल्यांचा नवीन ब्रॅण्ड ‘मंत्रा’ लॉन्च केला


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । मुंबई । इमामी या वैविध्यपूर्ण व्यवसाय समूहातील ब्रॅण्डेड अन्नपदार्थ उत्पादन कंपनी इमामी अग्रोटेक लिमिटेडने आज मंत्रा स्पाइसेस हे उत्पादन राष्ट्रीय स्तरावर लाँच केल्याची घोषणा केली. आपल्या सर्वदूर लोकप्रिय असलेल्या इमामी हेल्दी अँड टेस्टी या ब्रॅण्डखाली कंपनीने नवीन उत्पादन बाजारात आणले आहे.

म्हणजे शुद्ध व संमिश्र अशा पावडर स्वरूपातील मसाले व टेस्टमेकर्सची वैशिष्ट्यपूर्णरित्या डिझाइन करण्यात आलेली श्रेणी आहे. ही उत्पादने राजस्थानातील जयपूर येथील अत्याधुनिक कारखान्यात क्रायोजेनिक ग्राइंडिंग टेक्नोलॉजी वापरून तयार केली जातात. या तंत्रज्ञानात मसाले शून्य ते उणे ५० अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानावर बारीक केले जातात. यामुळे मंत्रा मसाल्यांमधील सुवासिक नैसर्गिक तेले किमान ९५ टक्क्यांपर्यंत जतन केली जाऊ शकतात व मसाल्यांना अधिक चांगला रंग, स्वाद व सुवास येतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेले मसाले पारंपरिक पद्धतीने कुटले जातात. या पद्धतीत मसाल्यांचे तापमान ७० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, त्यामुळे मसाल्यांतील सुवासिक तेले केवळ ४० टक्क्यांपर्यंतच जतन केली जातात.

इमामी अग्रोटेकचे संचालक श्री. कृष्णमोहन न्यायपती या नवीन प्रकाराच्या लाँचबद्दल म्हणाले, “मंत्रा स्पाइसेस पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरल्यानंतर आपले राष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान भक्कम करणे इमामी हेल्दी अँड टेस्टी ब्रॅण्डसाठी महत्त्वाचे होते. या वर्षाच्या अखेरीपर्यंत २ लाख रिटेल दुकानांपर्यंत , तर पुढील ३ वर्षांत ५ लाख रिटेल दुकानांपर्यंत आमची उत्पादने पोहोचवण्याची आमची योजना आहे आणि मॉडर्न ट्रेड व ई-कॉमर्स चॅनल्समार्फतही आम्ही उत्पादने सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. पुढील ५ वर्षांत मंत्रासाठी ७०० ते १००० कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आक्रमकतेने प्रयत्न करणार आहोत.”

ब्रॅण्डला इंटरनॅशनल टेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ ब्रुसेल्स (युरोप) या संस्थेतर्फे उत्तम दर्जाच्या मसाल्यांसाठी ‘सुपिरिअर टेस्ट अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. याशिवाय, मंत्राचे संमिश्र मसाल्यांचे प्रकार झिप-लॉक पाकिटांमध्ये असतात, जेणेकरून त्यांचा ताजेपणा व सुवास अधिक काळ टिकून राहतो.

इमामी अग्रोटेकने ग्राहकांच्या रसनेला आवाहन करण्यासाठी खास मंत्रा मसाला श्रेणी विकसित केली आहे. हे शुद्ध मसाले विस्तृत विभागांमध्ये उपलब्ध आहेत. यात हल्दी (हळद), मिर्ची (लाल तिखट), जीरा (जिरेपूड), धनिया (धणेपूड) अशी पावडर स्वरूपातील उत्पादने आहेत तसेच गरम मसाला, मीट मसाला, चिकन मसाला, पावभाजी मसाला, छोले मसाला, चाट मसाला, सब्जी मसाला असे मिश्र मसालेही आहेत. मंत्राचे हिंगही आहे. याशिवाय सांबार मसाला, कश्मिरी लालमिर्च यांसारखी उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत. पुढील टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर टेस्टमेकर्स बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे.


Back to top button
Don`t copy text!