यशवंतराव चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु : सचिन सूर्यवंशी (बेडके)


स्थैर्य, फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी साठी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रवेश प्रक्रिया दिनांक ३ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव व नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी दिली आहे. 

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी साधनांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी यशवंतराव चव्हाण हायकूल व कनिष्ठ महाविद्यालयातील नोटीस बोर्डवर व मोबाईलवर जाहीर करण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थांनी ज्या विभागात ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, त्या विभागात त्यांनी प्रवेश प्रवेश प्रक्रिया प्रमुखांशी संपर्क साधावा. विद्यार्थाना आपला प्रवेश गुरुवार ३ सप्टेंबर २०२० अखेर निश्चित करावा लागणार आहे. द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थांनी आपला प्रवेश सोमवार दिनांक ७ सप्टेंबर व मंगळवार दिनांक ८ सप्टेंबर २०२० अखेर निश्चित करायचा आहे. अधिक माहिती साठी कला विभागासाठी पी. डी. घनवट (मो.बा.: ९६५७२१३०३७), वाणिज्य विभाग ए. एस. तांबोळी (मो.बा.: ९९२१५७७५७१), विज्ञान विभाग पी. व्ही. साळुंखे (मो.बा.: ७५८८१६४१८९), व्यवसाय अभ्यासक्रम ए. ए. बागवान (मो.बा.: ९४२०६२९८८९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आलेले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!